काठमांडू : नेपाळमध्ये शुक्रवारी सकाळी भूकंपाचे दोन सौम्य धक्के बसले. त्यात प्राण अथवा जीवितहानी झालेली नाही. बैताडी जिल्ह्यात खलंगा परिसरात मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास ५.१ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाला. दुपारी दोन वाजता दुसरा धक्का बसला. तो ३.७ रिश्टर स्केल क्षमतेचा होता. एका पाठोपाठ दोन भूकंपाचे हादरे बसल्यानंतर नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. अन्य तीन जिल्ह्यांतही भूकंपाचे हादरे जाणवले.
Fans
Followers